दिवाळीतही झेंडू खाणार चांगला भाव
पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी राज्यातील अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाल्याने पाणीच पाणी झाले होते. ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने
झेंडू


पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी राज्यातील अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाल्याने पाणीच पाणी झाले होते. ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक गावांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र दसरा सणानंतर रब्बी हंगामातील पिकांसाठी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या बागा काढून टाकल्याने दिवाळीत झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीतही झेंडूला चांगला बाजारभाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

पुरंदर तालुक्यात यंदा झेंडूच्या लागवडीत वाढ झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यावर्षी 156.5 हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड झाली आहे, तर मागील वर्षी ती फक्त 139.2 हेक्टर होती. म्हणजेच मागील वर्षापेक्षा 17.3 हेक्टर अधिक झेंडू लागवडीत आले आहेत. दसऱ्याच्या वेळी झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो 80 ते 100 रुपये भाव मिळाले होते. रब्बीसाठी झेंडू काढल्यामुळे बाजारात पुरवठा कमी राहिला आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande