पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचा पुनर्विकास करण्यासाठी आवश्यक निधीसाठीचा प्रस्ताव महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून विविध विभागाअंतर्गत हा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वसतिगृहाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असला, तरीही पुनर्विकासाचे काम सुरू होण्यास आणखी बराच विलंब होण्याची शक्यता आहे.
या घटनेनंतर वसतिगृहातील स्वच्छतेसह पुनर्विकासाचा प्रश्न पुढे आला होता. तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाची पाहणी करून तातडीच्या दुरुस्त्यांची कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच संबंधित इमारत जुनी व जीर्ण झाल्याने वसतिगृहाच्या पुनर्विकास करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने इमारतीचा विकास आराखडा तयार केला होता, त्यास इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
दरम्यान, वसतिगृहाचा पुनर्विकासाचे काम महापालिका व राज्य सरकार यांच्यातर्फे केले जाणार आहे. वसतिगृह उभारणीसाठी आवश्यक निधी महापालिका व राज्य सरकार खर्च करणार आहे. दरम्यान, निधीसाठीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, राज्य सरकारने संबंधित प्रस्तावामध्ये त्रुटी काढून दुरुस्तीसह प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महापालिकेस केल्या होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु