पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्ह्यात खरीप हंगामात पाच कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ४ हजार २८९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे ८५ टक्केच पीककर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षी उद्दिष्टाच्या ११० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. तर त्या तुलनेत यंदा कर्जवाटपात सुमारे ९०० कोटींची घट झाली आहे.
पुणे जिल्हा बँकर्सची जिल्हा सल्लागार समिती आणि जिल्हास्तर आढावा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यातून ही माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात २०२४ मध्ये खरीप हंगामाचे पीककर्जाचे (किसान क्रेडिट कार्ड) उद्दिष्ट ४ हजार ४५४ कोटी देण्यात आले होते. किसान क्रेडिट कार्ड (पीक कर्ज) अंतर्गत सप्टेंबरअखेर ५ हजार १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप जिल्ह्यातील विविध बँकांनी करून, ११६ टक्के लक्ष्य गाठले होते. यंदा उद्दिष्टात सुमारे ६४६ कोटी रुपयांची वाढ करून एकूण उद्दिष्ट ५ हजार कोटींचे देण्यात आले होते. आतापर्यंत जिल्हा, सहकारी व खासगी बँकांनी मिळून ४ हजार २८९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु