सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्यांना सरसकट मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली. मात्र, पाच दिवस ऊस व फळ बागांच्या शेंड्यापर्यंत पाणी असेल तरच त्या पिकांचे नुकसान होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीकाठ वगळता अन्य ठिकाणी उसाचे नुकसान झाले नाही समजून पंचनामे करण्यात आले आहेत. फळबागांचे नुकसान जागेवर जाऊन पाहण्यात आले.
राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरामुळे ५५० पेक्षा जास्त तालुक्यांमधील ४७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. मात्र, ऊस व फळबागांच्या क्षेत्राचे पंचनामे अटींवर बोट ठेवून केले आहेत. फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करताना बागा भविष्यात व्यवस्थिती येतील की नाही, हे न पहाता सध्या बाग बहारात होती का, ही बाब पाहिली जात आहे.
अतिवृष्टी, महापुरामुळे पंचनामे करायला त्याठिकाणी जाणे शक्य नव्हते. त्यामुळे नुकसनीच्या फोटोची अट शिथील करण्यात आली. मात्र, आता पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोटो घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे अनेकजण भरपाईपासून वंचित राहतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड