सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)शहर पोलिस दलातील वाहतूक पोलिस अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोडे (वय ३२, रा. अरविंद धाम, पोलिस वसाहत सोलापूर) यांचा बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत ही बाब समोर आली आहे.
पोलिस नाईक चव्हाण यांनी समक्ष कळविले की, फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत दाखल झाले आहे. त्यांच्या पत्नीने सांगितले की ते बेडवर झोपले होते. पहाटे पाचच्या सुमारास झोपेतच बेडवरून पडले. त्यांना डोक्यामागील बाजूस जबर मार लागला. त्यानंतर त्यांना उलटी झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल केले.
त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली असून अंत्यविधीसाठी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने पोलिस दलातील त्यांच्या मित्रांनाही धक्का बसला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड