मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। कॅनन इंडियाने १४ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ब्रॉडकास्ट इंडिया शो २०२५ मध्ये आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे. मीडिया, ब्रॉडकास्ट आणि कंटेंट क्रिएशन तंत्रज्ञानासाठी दक्षिण आशियातील हे अग्रगण्य व्यासपीठ आहे. या शोमधील मुख्य आकर्षण कॅननचा नवीनतम कॉम्पॅक्ट डिजिटल सिनेमा कॅमेरा, ईओएस सी५० हा आहे, जो व्यावसायिक व्हिडिओ निर्मितीसाठी डिझाइन केला गेला आहे.
कॅनॉनच्या बूथमध्ये सिनेमा, व्हर्च्युअल प्रॉडक्शन आणि लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी लागणाऱ्या इमेजिंग सोल्यूशन्सचे एक परिपूर्ण वातावरण तयार करण्यात आले आहे. अभ्यागतांना इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष निर्मिती क्षेत्रातील अनुभव घेता येणार आहे. या बूथमध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर्सच्या नेतृत्वाखाली लाईव्ह शूटिंग झोन, व्हर्च्युअल प्रॉडक्शनचे डेमो आणि औद्योगिक सत्रे आयोजित केली आहेत, ज्यामुळे ब्रॉडकास्ट, ओटीटी आणि सिनेमासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेणे शक्य होईल.
कॅनन इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ तोशियाकी नोमुरा म्हणाले, आम्हाला इमेजिंग इनोव्हेशनचे भविष्य घडवण्याचा अभिमान आहे. व्हिडिओवर केंद्रित असलेल्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ब्रॉडकास्ट इंडिया शो २०२५ मध्ये आम्ही सादर करत आहोत. या वर्षी, आम्ही आमच्या प्रतिष्ठित ईओएस आणि पीटीझेड कॅमेरा रेंजसह प्रथमच ईओएस सी५० भारतात सादर करत आहोत. आधुनिक निर्मिती क्षेत्राच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आमची विस्तृत इमेजिंग श्रेणी बनवली आहे.
या बूथचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि कॅनन सिनेमा ईओएस ॲम्बेसेडर किरण देवहंस, आयएससी आणि सुदीप चॅटर्जी, आयएससी यांच्या हस्ते झाले. 'कयामत से कयामत तक', 'जोधा अकबर' आणि 'अग्निपथ' यांसारख्या चित्रपटांसाठी देवहंस प्रसिद्ध आहेत, तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चॅटर्जी यांनी 'चक दे! इंडिया', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या चित्रपटांद्वारे सिनेमॅटिक क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत.
कॅननचे हे एकात्मिक सेटअप्स 'अपुचर', 'ईझो', 'सेन्हाईझर', 'सॅनडिस्क', 'अटमोस', 'मो-सिस' आणि 'प्रोटेक' यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान भागीदारांच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. हे संपूर्ण इमेजिंग सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या कॅननच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule