‘मृगांक’ कलेक्शन सणासुदीच्या दागिन्यांना देते अनोखी अभिव्यक्ती
नागपूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : टाटा समूहाचा भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या तनिष्कने आपल्या सणासुदीच्या खास दागिन्यांच्या सादरीकरणात नवीन अध्याय सुरू करत ‘मृगांक’ हे नवे कलेक्शन सादर केले आहे. हे कलेक्शन पारंपरिक कथाकथन, कल्पनारम्य आकृती, आणि अत्याधुनिक डिझाइन यांचा सुंदर संगम आहे.
'मृगांक' कलेक्शनमध्ये तरंगते राजवाडे, आकाशीय उद्याने, पौराणिक प्राणी आणि दुर्मिळ फुलांची भव्यता सोन्याच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. हे फेस्टिव कलेक्शन केवळ सौंदर्यदृष्ट्या नाही, तर सांस्कृतिक दृष्टीनेही समृद्ध आहे. माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर या कलेक्शनची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडण्यात आल्या आहेत, ज्यांनी या अलौकिक भावनेला एक मूर्त रूप दिले आहे.तनिष्कच्या डिझाईन टीमने स्टोन-ऑन-स्टोन जडाऊ, मीनाकारी, थ्रीडी आकृतिबंध, आणि गुंतागुंतीच्या जाळीच्या तंत्रांचा वापर करून हे कलेक्शन घडवले आहे. प्रत्येक दागिना म्हणजे एक कथा, एक अनुभव – जी परिधान करणाऱ्याला एका कल्पनारम्य जगात घेऊन जाते.
टायटन कंपनी लिमिटेडच्या चीफ डिझाईन ऑफिसर, रेवती कांत यांनी सांगितले की,
“'मृगांक' हे कलेक्शन सणासुदीचा आनंद, सौंदर्य आणि आश्चर्याची अनुभूती देणारे आहे. यामध्ये आपण भारतीय कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि तनिष्कची डिझाइन कौशल्यं यांचे अनोखे मिश्रण पाहू शकता. या दागिन्यांमध्ये सोन्यात साकारलेले स्वप्न, गूढता आणि फॅशन यांचा सुरेख संगम आहे.”मृगांक कलेक्शन विविध प्रकारच्या किंमत श्रेणीत उपलब्ध असून, हे दागिने स्वतःसाठी किंवा भेटवस्तूप्रमाणेही आदर्श ठरतात. दिवाळी साजरी करताना प्रत्येक स्त्रीला तिच्या सौंदर्यात भर घालणारे हे कलेक्शन, कालातीत, अर्थपूर्ण आणि मौल्यवान दागिन्यांचा अनुभव देते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके