मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। इंडिगो एअरलाइन्सने आपल्या प्रवाशांसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. ‘फ्लाइंग कनेक्शन्स सेल’ नावाची ही विशेष ऑफर 13 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत ग्राहकांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या प्रवासासाठी तिकिटे बुक करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या ऑफरमध्ये देशांतर्गत विमानांचे तिकीट केवळ 2390 रूपयांपासून सुरू होत आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकिटांची किंमत 8990 रूपयांपासून सुरू होणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
इंडिगोच्या या ऑफरमध्ये तब्बल 8000 पेक्षा अधिक मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. हे मार्ग भारतातील 90 प्रमुख आणि लहान शहरांना तसेच परदेशातील 40 शहरांना जोडतात. त्यामुळे प्रवाशांना लहान शहरांपासून मोठ्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत सहज आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे. उदाहरणार्थ, कोची ते शिवमोगा या मार्गाचे भाडे फक्त 2390 रूपये निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लखनौ ते रांची आणि पटना ते रायपूर या मार्गांसाठी तिकिटांची किंमत 3590 रूपये आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीही इंडिगोने या सेलमध्ये विशेष सवलत उपलब्ध करून दिली आहे. कोची ते सिंगापूर हे तिकीट 8990 रूपयांपासून सुरू होत असून, अहमदाबाद ते सिंगापूर या मार्गाचे भाडे 9990 रुपये आहे. जयपूर ते सिंगापूर प्रवासाचे भाडे 10190 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच लखनौ ते हनोई हे तिकीट 10990 रूपये, तर जयपूर ते हनोई हे तिकीट 11390 रूपये असणार आहे. या आकर्षक दरांमुळे प्रवाशांना लोकप्रिय आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांकडे परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
इंडिगोने या ऑफरबाबत काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. ही ऑफर फक्त इंडिगो-ऑपरेटेड फ्लाइट्ससाठीच लागू आहे. प्रवाशांना सिंगल किंवा राऊंड ट्रिप दोन्ही प्रकारच्या बुकिंगचा पर्याय मिळणार असला, तरी या ऑफरअंतर्गत मर्यादित तिकिटेच उपलब्ध असतील. त्यामुळे बुकिंग लवकर करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. या ऑफरचा लाभ घेतलेल्या प्रवाशांना इंडिगोच्या इतर कोणत्याही सवलती किंवा ऑफर्सचा लाभ मिळणार नाही. तसेच तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड दिला जाणार नाही. या ऑफरचा लाभ ग्रुप बुकिंगसाठी लागू नसणार आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी व्हिसा, आरोग्य आणि संबंधित देशांच्या सरकारी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास बोर्डिंग नाकारले जाऊ शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे.
देशांतर्गत मार्गांसाठी इंडिगो सेल भाडे:
कोची - शिवमोगा: २,३९० रुपयांपासून पुढे
लखनौ - रांची: ३,५९० रुपयांपासून पुढे
पाटणा - रायपूर: ३,५९० रुपयांपासून पुढे
कोची - विशाखापट्टणम: ४,०९० रुपयांपासून पुढे
जयपूर - रायपूर: ४,१९० रुपयांपासून पुढे
अहमदाबाद - प्रयागराज: ४,४९० रुपयांपासून पुढे
पाटणा - इंदूर: ४,५९० रुपयांपासून पुढे
कोची - भुवनेश्वर: ४,६९० रुपयांपासून पुढे
जयपूर - भुवनेश्वर: ४,६९० रुपयांपासून पुढे
लखनौ - भुवनेश्वर: ४,७९० रुपयांपासून पुढे
आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी इंडिगो सेल भाडे:
कोची - सिंगापूर: ८,९९० रुपयांपासून पुढे
अहमदाबाद - सिंगापूर: ९,९९० रुपयांपासून पुढे
जयपूर - सिंगापूर: १०,१९० रुपयांपासून पुढे
लखनऊ - हनोई: १०,९९० रुपयांपासून पुढे
जयपूर - हनोई: ११,३९० रुपयांपासून पुढे
अहमदाबाद - हनोई: ११,७९० रुपयांपासून पुढे
पाटणा - सिंगापूर: ११,७९० रुपयांपासून पुढे
लखनऊ - सिंगापूर: ११,८९० रुपयांपासून पुढे
पाटणा - हो ची मिन्ह सिटी: १३,६९० रुपयांपासून पुढे
जयपूर - अॅमस्टरडॅम: १५,५९० रुपयांपासून पुढे
(भाडे उपलब्धतेनुसार आहेत आणि मागणीनुसार बदलू शकतात.)
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule