मेर्सिडीज बेंझ जी-क्लास जी 450डी भारतात लॉन्च
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। मेर्सिडीज-बेंझ इंडियाने आपल्या आयकॉनिक लक्झरी ऑफ रोडर जी क्लासचा नवीन डिझेल प्रकार — G 450d भारतात सादर केला आहे. या लॉन्चसह भारतात आता जी-क्लासचा डिझेल, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही प्रकारांमध्ये पर्याय उपलब्ध झाले
Mercedes-Benz G-Class


मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। मेर्सिडीज-बेंझ इंडियाने आपल्या आयकॉनिक लक्झरी ऑफ रोडर जी क्लासचा नवीन डिझेल प्रकार — G 450d भारतात सादर केला आहे. या लॉन्चसह भारतात आता जी-क्लासचा डिझेल, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही प्रकारांमध्ये पर्याय उपलब्ध झाले आहेत. नव्या जी 450डी ची किंमत 2.90 कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) ठेवण्यात आली असून, सुरुवातीला फक्त ५० युनिट्स मर्यादित ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.

मेर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर म्हणाले, “जी 450डी ही आमची पहिलीच डिझेल जी-क्लास मॉडेल असून, ती शक्ती आणि कार्यक्षमतेचा संगम आहे. भारतातील ग्राहकांची डिझेल वाहनांबाबतची मागणी लक्षात घेऊन आम्ही हा पर्याय आणला आहे.”

नव्या डी450डी मध्ये 3.0-लिटर इनलाइन सहा-सिलिंडर डिझेल इंजिन बसवले असून, ते 48व्ही माइल्ड-हायब्रिड सिस्टीम सह कार्य करते. हे इंजिन 362 बीएचपी पॉवर आणि 750 एनएम टॉर्क निर्माण करते, तर इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटरमुळे आणखी 20 बीएचपी इलेक्ट्रिक बूस्ट मिळतो. ही एसयूव्ही 0 ते 100 किमी/ता. वेग फक्त 5.8 सेकंदांत गाठते आणि तिचा कमाल वेग 210 किमी/ता. आहे.

ऑफ-रोड क्षमतेबाबत, जी 450डी मध्ये जी-क्लासची पारंपरिक ताकद कायम ठेवण्यात आली आहे. यात तीन मेकॅनिकल डिफरेंशियल लॉक्स, लॅडर-फ्रेम चेसिस, डबल विशबोन फ्रंट सस्पेन्शन आणि रिजिड रियर अ‍ॅक्सल आहे. ही एसयूव्ही 100% ग्रेडेबिलिटी, 241 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, 70 सें.मी. फोर्डिंग डेप्थ आणि 31°/30° एप्रोच-डिपार्चर अँगल्स सह उत्कृष्ट ऑफ-रोड कार्यक्षमता देते.

अंतर्गत डिझाइनमध्ये अत्याधुनिक लक्झरी आणि तंत्रज्ञानाचा संगम दिसतो. नवीन G 450d मध्ये MBUX NTG7 इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यात दोन 12.3-इंचांचे स्क्रीन, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी नेव्हिगेशन, तसेच वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले आहेत. ऑफ-रोड कॉकपिट मोड मध्ये स्टीयरिंग अँगल, कंपास, टायर प्रेशर, उंची आणि डिफरेंशियल लॉकची माहिती दाखवली जाते. ‘ट्रान्सपेरंट हूड’ फिचरमुळे अवघड भूभागावर वाहन चालवताना दृश्यमानता अधिक सुधारते.

केबिनमध्ये दोन-टोन नप्पा लेदर अपहोल्स्ट्री, बर्मेस्टर 3D सराउंड साउंड सिस्टीम विथ डॉल्बी अ‍ॅटमॉस, अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि मॅन्युफॅक्टूर पर्सनलायझेशन प्रोग्रॅमद्वारे ग्राहकांना आपले वाहन विशेष रंग व ट्रिमसह कस्टमाइज करण्याची सुविधा दिली आहे.

सुरक्षेच्या बाबतीत, G 450d मध्ये अ‍ॅक्टिव्ह ब्रेक असिस्ट, लेन कीपिंग असिस्ट, ऍडॅप्टिव्ह डॅम्पिंग आणि 360-डिग्री कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. आवाज कमी ठेवण्यासाठी अ‍ॅकूस्टिक ग्लास आणि उच्च दर्जाचे इन्सुलेशन वापरण्यात आले आहे.

ग्राहकांसाठी एक अनोखा अनुभव देण्यासाठी मेर्सिडीज-बेंझ इंडियाने ‘G-Tribe Escapade’ नावाचा विशेष एसयूव्ही ड्राइव्ह अनुभव जाहीर केला आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान हा कार्यक्रम भूतानमध्ये आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये सहभागी भारतातून थिम्फू, पुनाखा आणि पारोपर्यंत प्रवास करतील. या मोहिमेत AMG G 63, G 580, EQS SUVs, GLS आणि GLE सारख्या मॉडेल्सचा सहभाग असेल.

1979 मध्ये पहिल्यांदा सादर झालेली जी-क्लास आजही तिच्या काळातीत डिझाइन, दमदार ऑफ-रोड परफॉर्मन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लक्झरी एसयूव्ही वर्गात आदर्श मानली जाते. मेर्सिडीज-बेंझ इंडियाचे पुण्याजवळील चाकण येथील उत्पादन केंद्र हे या ब्रँडच्या जागतिक नेटवर्कचा भाग असून, कंपनीने भारतात रु. 3,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे आणि देशभरात ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये १४० टचपॉइंट्स उपलब्ध केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande