टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। टाटा ऑटो कॉम्प सिस्टीम्स लिमिटेड तर्फे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात रेल्वे क्षेत्रासाठीच्या आपल्या विस्तृत उत्पादनांचे प्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीच
Tata Auto Comp


मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। टाटा ऑटो कॉम्प सिस्टीम्स लिमिटेड तर्फे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात रेल्वे क्षेत्रासाठीच्या आपल्या विस्तृत उत्पादनांचे प्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीची थीम रेल्वेच्या भविष्याला आकार देणे ही असेल, ज्या अंतर्गत कंपनी आपले नवीन उत्पादने, उपाययोजना आणि धोरणात्मक भागीदारी दर्शविणार आहे.

टाटा ऑटो कॉम्पने आपल्या मुख्य ऑटोमोटिव्ह घटकांच्या व्यवसायापलीकडे जात, रेल्वेला एक प्रमुख फोकस क्षेत्र म्हणून ओळखले आहे. उप-अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले, भारताचे रेल्वे जाळे वेगाने आधुनिकीकरणातून जात आहे, आणि उत्तम पायाभूत सुविधा तसेच प्रवाशांच्या सोयीवर सरकारचे लक्ष या विभागात प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ दर्शवते.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कोलहटकर म्हणाले की, भारतीय रेल्वे आतापर्यंत आयात केलेल्या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कंपनीचा उद्देश या तंत्रज्ञानाला भारतात आणून त्यांचे स्थानिकीकरण करणे आहे. ते म्हणाले, आम्ही टाटा ऑटो कॉम्पच्या उत्पादन उत्कृष्टतेला आमच्या भागीदारांच्या जागतिक विशेषज्ञतेसोबत भारतीय बाजारपेठेसाठी टिकाऊ, किफायतशीर आणि उच्च-गुणवत्तेचे उपाय प्रदान करत आहोत.

या संयुक्त उपक्रमामुळे मुख्य रेल्वे घटकांचे देशांतर्गत एंड-टू-एंड उत्पादन शक्य होईल, ज्यामुळे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमांना बळ मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande