परळीत 4.58 लाखांचे 22 गहाळ मोबाईल मालकांना परत
बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ झालेले 22 मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मालकांच्या ताब्यात परत केले. या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ₹4,58,000 इतकी आहे. गेल्या काही महिन्यांत परळी शहर पोलीस स्टेशन हद्दीतून
परळीत 4.58 लाखांचे 22 गहाळ मोबाईल मालकांना परत


बीड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

परळी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ झालेले 22 मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मालकांच्या ताब्यात परत केले. या मोबाईल फोनची एकूण किंमत अंदाजे ₹4,58,000 इतकी आहे.

गेल्या काही महिन्यांत परळी शहर पोलीस स्टेशन हद्दीतून हे मोबाईल गहाळ झाले होते. या मोबाईलपैकी काही मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढण्यात पोलीस यशस्वी झाले. यानंतर या मोबाईलचे मालकांना औपचारिकरित्या वितरण करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल नागरिकांनी परळी पोलिसांचे कौतुक केले असून पोलिस प्रशासनाकडून पुढेही अशाच पद्धतीने नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande