दीपिका पदुकोण ठरली ‘मेटा एआय’साठी आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी
मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री दीपिका पदुकोण आता तंत्रज्ञानाच्या विश्वातही नवी ओळख निर्माण करत आहे. दीपिकाने ‘मेटा एआय’ (Meta AI) सोबत ऐतिहासिक हातमिळवणी करत या एआयसाठी आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी म्हणून इतिहास र
दिपीका


मुंबई, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री दीपिका पदुकोण आता तंत्रज्ञानाच्या विश्वातही नवी ओळख निर्माण करत आहे. दीपिकाने ‘मेटा एआय’ (Meta AI) सोबत ऐतिहासिक हातमिळवणी करत या एआयसाठी आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी म्हणून इतिहास रचला आहे.

दीपिकाचा हा खास आणि मोहक आवाज आता WhatsApp, Ray-Ban Meta Smart Glasses, Instagram आणि Metaच्या इतर प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळणार आहे. याआधी John Cena, Judi Dench, Awkwafina यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ‘मेटा एआय’ साठी आपले आवाज दिले आहेत.

दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. या व्हिडिओमध्ये ती स्टुडिओमध्ये आवाज देताना म्हणते —“Hi, I am Deepika Padukone. I am the new voice of Meta AI. So tap the ring and my voice will run out.”

हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलं, “हे खूपच कूल आहे असं मला वाटतं! आता मी ‘मेटा एआय’ चा भाग झाले आहे, आणि तुम्ही माझ्या आवाजात इंग्रजीतून भारत, अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये चॅट करू शकता.”

सध्या दीपिकाचा आवाज या निवडक देशांमध्ये उपलब्ध असून, तिचा हा नवा डिजिटल अवतार प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्साहित करणारा ठरला आहे.

‘पठाण’नंतर दीपिका सध्या अल्लू अर्जुन आणि अ‍ॅटली यांच्या बिग-बजेट चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande