नाशिक, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आज सायंकाळी विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. सैन्य दल आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, एचएएलचे चेअरमन डॉ. डी. के. सुनील, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मेजर जनरल अभिमन्यू रॉय, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ब्रिगेडियर एन. आर. पांडे, ग्रुप कॅप्टन हरीश निर्वाल (स्टेशन कमांडर), पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV