गुजरातमध्ये सर्व १६ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवले राजीनामे
गांधीनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - गुजरात सरकारमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल होत आहे. राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच हा बदल केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र चालू आहे. त्याचाच भाग म्हणून आज, गुरुवारी मुख्यमंत्री भूपेंद्र
गुजरात मंत्रिमंडळ


गांधीनगर, 16 ऑक्टोबर (हिं.स.) - गुजरात सरकारमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल होत आहे. राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच हा बदल केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र चालू आहे. त्याचाच भाग म्हणून आज, गुरुवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व 16 मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. दरम्यान नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता महात्मा मंदिरात होणार आहे. आज रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर वरिष्ठ भाजप नेते यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते ११ विद्यमान मंत्र्यांना काढून त्याजागी १४ ते १६ नवीन चेहरे मंत्रिपदाची शपथ घेतील.

राजीनामे दिलेल्या मंत्र्यांमध्ये कनुभाई देसाई (वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स), बलवंतसिंह राजपूत (उद्योग, कामगार आणि रोजगार), हृषीकेश पटेल (आरोग्य, कुटुंब कल्याण आणि उच्च शिक्षण), राघवजी पटेल (कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय), कुंवरजीभाई बावलिया (पाणीपुरवठा आणि नागरी पुरवठा), भानुबेन बाबरिया (सामाजिक न्याय आणि महिला व बाल विकास), मुलुभाई बेरा (पर्यटन, वन आणि पर्यावरण), कुबेर दिंडोर (शिक्षण आणि आदिवासी विकास), नरेश पटेल, बच्चूभाई खबर, परशोत्तम सोळंकी, हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा, मुकेशभाई झिनाभाई पटेल, कुणवाजीभाई हलपती, भिकूभाई चतुरसिंग परमार यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande