भारताचे 'आकाश' क्षेपणास्त्र ब्राझीलचे रक्षण करणार
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि ब्राझील यांच्यात ‘आकाश’ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम संदर्भात चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर असा अंदाज लावला जात आहे की, ब्राझील आगामी काळात भारताची एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करू शकतो. भारताचे संरक्षण मंत्री रा
भारत आणि ब्राझील यांच्यात ‘आकाश’ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम संदर्भात चर्चा


नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि ब्राझील यांच्यात ‘आकाश’ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम संदर्भात चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर असा अंदाज लावला जात आहे की, ब्राझील आगामी काळात भारताची एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करू शकतो. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीमध्ये ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन आणि ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंटेइरो फिल्हो यांच्याशी भेट घेतली. या भेटीबद्दलची माहिती राजनाथ सिंह यांनी स्वतः दिली. यानंतरच ब्राझीलकडून भारतीय संरक्षण उपकरणे खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजनाथ सिंह यांनी भेटीनंतर त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलं, “आज नवी दिल्लीमध्ये ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन आणि ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंटेइरो फिल्हो यांच्याशी भेट होऊन आनंद झाला.या भेटीत आम्ही लष्करी ते लष्करी सहकार्य आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर भर देत संरक्षण सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण चर्चा केली.”

भारत आणि ब्राझीलच्या नेत्यांमधील बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी संरक्षण उपकरणांच्या सह-विकासाची क्षमता हा एक मुद्दा होता. या चर्चेचा उद्देश सामायिक सुरक्षा ध्येय साध्य करण्यासाठी निर्मिती व नवकल्पनांमध्ये दोन्ही देशांच्या क्षमतांचा लाभ घेणे हा होता. याच बैठकीदरम्यान भारताने ब्राझीलसमोर स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिम ‘आकाश’ पुरवण्याचा प्रस्ताव ठेवला.

‘आकाश’ ही भारताची स्वदेशी बनावटीची, मध्यम पल्ल्याची, जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टिम आहे, जी डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) ने विकसित केली आहे. याचं नाव संस्कृतमधील “आकाश” या शब्दावरून घेतलं आहे. ही प्रणाली मुख्यत्वे शत्रूचे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि युएवी (मानवरहित विमाने) अशा हवाई धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी डिझाइन केली आहे.

ही प्रणाली भारतीय वायुसेना आणि भारतीय सैन्यात वापरात आहे. याचं उत्पादन भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत केलं जातं.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande