झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : पाच आरोपींना अटक, बक्सा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
गुवाहाटी, १६ ऑक्टोबर (हिं.स.) - प्रसिद्ध गायिका झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणातील पाच आरोपींना बक्सा तुरुंगात पाठवल्यानंतर बुधवारी निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बक्सा जिल्ह्यात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आ
पाच आरोपींना अटक केल्यानंतर बक्सा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद


गुवाहाटी, १६ ऑक्टोबर (हिं.स.) - प्रसिद्ध गायिका झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणातील पाच आरोपींना बक्सा तुरुंगात पाठवल्यानंतर बुधवारी निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बक्सा जिल्ह्यात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाइल सेवा प्रदात्यांना इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे निर्देश लागू राहतील. या काळात व्हॉइस कॉल आणि ब्रॉडबँड कनेक्शनसाठी टेलिफोन लाईन्स कार्यरत राहतील. राज्य सरकारच्या गृह आणि राजकीय विभागांनी हे निर्देश जारी केले.

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणातील पाच आरोपींना बक्सा तुरुंगात पाठवल्यानंतर बक्सा तुरुंग परिसराबाहेर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा, संदीपन गर्ग, परेश वैश्य आणि नंदेश्वर बोर या पाच आरोपींना बुधवारी १४ दिवसांच्या सीआयडी कोठडी संपल्यानंतर सीजेएमच्या न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. गुवाहाटी मध्यवर्ती कारागृहाऐवजी पाचही आरोपींना बक्सा कारागृहात पाठवण्यात आले. तथापि, पाचही आरोपींना बक्सा कारागृहात हलवल्याने संताप आणि निदर्शने वाढली.

निदर्शनांच्या दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना बक्सा कारागृहात दाखल केले. पण तुरुंगाबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. संतप्त निदर्शक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर करावा लागला. सौम्य बळाचा वापर केला आणि हवेत गोळीबारही केला.

या घटनेत, दीपक मेधी नावाच्या एका तरुणाला पाठीत गोळी लागल्याने दुखापत झाली. त्यानंतर त्याला चांगसारी येथील एम्समध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. बक्सा येथे पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या दीपक मेधीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. तरीही, परिसरात तणाव कायम आहे. प्रशासनाने बक्सा तुरुंगाभोवती बीएनएसचे कलम १६३ लागू केले आहे, ज्यामध्ये तीनपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande