मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
संगीतमय प्रेमकथा हा एक दुर्मिळ सिनेमॅटिक अनुभव असतो, जो गोड रोमान्स आणि सुरेल गाण्यांची एकत्र गुंफण करतो आणि मनात खोल दडलेल्या भावना जागवतो, ज्या चित्रपट संपल्यानंतर देखील मनात रुंजी घालत राहतात. मेट्रो .. इन दिनों हा असाच एक खास अनुभव आहे, ज्यामध्ये एकात एक अडकलेल्या कथानकांच्या आणि अप्रतिम संगीताच्या माध्यमातून आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत टिपली आहे. अनुराग बसूचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट केवळ एक प्रेम कथा सांगत नाही, तर तुम्हाला त्याचा अनुभव देतो आणि या पठडीच्या उत्तम चित्रपटांत आपले स्थान निर्माण करतो. रविवार, 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता मेट्रो.. इन दिनोंच्या प्रीमियरसह सोनी MAX वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव घेऊन येण्यासाठी सज्ज आहे.
‘मेट्रो.. इन दिनों’ हा अनुराग बसूच्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ चा सिक्वल आहे. यामध्ये एकात-एक गुंतलेल्या अनेक कथा आहेत आणि त्यामधून देशभरातील शहरांमध्ये दिसणाऱ्या आधुनिक नात्यांच्या गुंतागुंतीचा शोध घेतला आहे. हृदयस्पर्शी लिखाण, त्यातील मोठमोठे कलाकार आणि भावप्रधान संगीत याबद्दल हा चिटपट खूप वाखाणला गेला आहे. समीक्षकांनी पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फझल, फातिमा सना शेख, नीना गुप्ता, अनुपम खेर, आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे आणि प्रेम, नुकसान आणि पुनर्प्राप्तीच्या एकमेकांत गुंतलेल्या कथा सादर करताना त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या अस्सलतेला दाद दिली आहे. अनुराग बसूचे दिग्दर्शन आणि प्रीतमचे सुमधुर संगीत म्हणजे जणू चित्रपटाची धडकन आहे. त्या सुरांचा परिणाम चिटपट संपल्यानंतर देखील तुमच्या मनावर दीर्घकाळ राहतो. या चित्रपटात डेटिंग अॅप कल्चर, कारकीर्दीचा दबाव, तडजोडी यांसारख्या समकालीन विषयांना स्पर्श केला आहे. आजच्या धावत्या शहरी जगात लोक प्रेम आणि गोंधळात कसे जगत असतात, यावर हा चित्रपट एक दृष्टिक्षेप टाकतो.
या रविवारी, सोनी MAX आपल्या प्रेक्षकांना हा सिनेमॅटिक चित्रपट बघण्यासाठी, संगीत, प्रेम आणि जीवनातील सुंदर अपूर्णतेची गोडी चाखण्यासाठी आमंत्रित करत आहे. टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच ‘मेट्रो.. इन दिनों’चा संडे मेगा प्रीमियर बघा, रविवार 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता फक्त सोनी MAX वर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर