लखनौ-दिल्ली प्रवासासाठी १८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान अतिरिक्त बसेस
नवी दिल्ली , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।सणासुदीचा काळ लक्षात घेता आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. लखनऊ विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या नऊ डेपोमधील एकूण १०५० पैकी ९५० बसेस सतर्कतेसह सेवेसाठी तैनात करण्
लखनौ-दिल्ली प्रवासासाठी १८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान उत्तर प्रदेशमधून धावणार अतिरिक्त बसेस


नवी दिल्ली , 17 ऑक्टोबर (हिं.स.)।सणासुदीचा काळ लक्षात घेता आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. लखनऊ विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या नऊ डेपोमधील एकूण १०५० पैकी ९५० बसेस सतर्कतेसह सेवेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. रायबरेली डेपोच्या एकूण १७६ बसांपैकी १५८ बस सणांच्या काळात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सतर्क स्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस १८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान चालवण्यात येणार आहेत.

विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा या प्रमुख सणांदरम्यान प्रवाशांची गर्दी वाढते, त्यामुळे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रायबरेली ते लखनऊ दरम्यान मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाची गरज लक्षात घेता २० अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहेत. तसेच, रायबरेली ते दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांसाठी १८ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत १० विशेष बस चालवण्यात येणार आहेत.

रायबरेली डेपोच्या १५८ बसांचे वितरण असे ठेवले आहे की ज्याठिकाणी प्रवासी संख्या अधिक असेल तिथे स्थानिक अधिकारी अडथळ्यांशिवाय त्या बस पाठवू शकतील. दिल्लीसाठी नियमित बसव्यतिरिक्त १० अतिरिक्त बस आणि लखनऊसाठी २० अतिरिक्त बस १८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान चालवण्यात येणार आहेत. दिल्ली मार्गावर १८ ते २४ ऑक्टोबर दरम्यान ४० बसांचेच संचालन केले जाईल, कारण याच कालावधीत विशेष गर्दी अपेक्षित आहे. इतर मार्गांवर प्रवासी संख्येत ६० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यास तिथेही बस पाठवण्यात येणार आहेत.

प्रादेशिक व्यवस्थापक आर. के. त्रिपाठी यांच्या माहितीनुसार, विविध डेपोमध्ये बसांची अशी नेमणूक करण्यात आली आहे: रायबरेली डेपो: १७६ पैकी १५८ बस, चारबाग डेपो: १३३ पैकी १२० बस, अवध डेपो: १०४ पैकी ९४ बस, कैसरबाग निगम डेपो: १७२ पैकी १५५ बस, कैसरबाग अनुबंधित डेपो: १३४ पैकी १२१ बस, हैदरगढ़ डेपो: ११७ पैकी १०५ बस, उपनगरी डेपो: ११ पैकी १० बस, बाराबंकी डेपो: ११९ पैकी १०७ बस, आलमबाग डेपो: ८९ पैकी ८० बस याशिवाय, १०५ बस राखीव (रिझर्व्ह) ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचा वापर प्रवाशांची गर्दी अधिक झाल्यास करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande