बीड : शहरात छापा टाकून एलसीबीने अडीच लाखाचा गुटखा केला जप्त
बीड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड शहरातील झमझम कॉलनी या ठिकाणी अवैद्य गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी एका शेडमध्ये साठवून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना मिळाली होती, यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी
क


बीड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड शहरातील झमझम कॉलनी या ठिकाणी अवैद्य गुटखा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी एका शेडमध्ये साठवून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांना मिळाली होती, यानंतर त्यांनी स्वतः त्या ठिकाणी छापा टाकून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जिल्हाभरात अवैध धंद्याविरोधात मोठ्या कारवाया सुरू आहेत. बीड शहरातील झमझम कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्या ठिकाणी छापा मारला असता, याठिकाणी दोन लाख, 41 हजाराचा गुटखा मिळाला . आरोपी सय्यद रहमतउल्ला सय्यद रजाउल्लाह इनामदार वय 46 वर्षे रा.झमझम काँलनी यांने त्याच्या आर्थिक फायद्याकरीता आरोपी सय्यद अजमदउल्ला सय्यद रजाउल्लाह यांच्या सांगण्यावरून येथील पञ्याच्या शेड मध्ये हा माल ठेवला होता. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, श्री गोविंद राख, बागवान, श्री राहुल शिंदे, श्री अंकुश वरपे, श्री आनंद मस्के, स्वाती मंडे, श्री बबन सलगर, अलीम शेख, चालक सुनिल राठोड यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande