बीड : सोन्याची साखळी लंपास करणारा चोरटा जेरबंद
बीड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। सावरगाव घाट या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये एकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा
अ


बीड, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। सावरगाव घाट या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दसरा मेळाव्यामध्ये एकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती.

याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने यासंदर्भात तपास करून यातील आरोपीला जेरबंद केले आहे.

पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील लहू काशिनाथ नागरगोजे हे दसरा मेळावा निमित्त सावरगाव या ठिकाणी आले होते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास केली. यानंतर नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद झाला करण्यात आला होता. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या संदर्भात तपास सुरू केला. खबर्या मार्फत माहिती मिळाली की, सोन्याची चैन विकण्यासाठी तो बीड मध्ये थांबला आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चोरटा आकाश सोपान ससाणे (रा.राजूती ता.जि.बीड) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन दोन तोळ्याची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाट, सहा. पोलीस निरीक्षक धनराज जारवाल, श्री आशोक दुबाले, श्री सोमनाथ गायकवाड, श्री आनंद मस्के, श्री बाळी सानप, श्री यादव, सिध्देश्वर मांजर यानी केले. संबंधित आरोपीला अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande