कर्नाटक : महाविद्यालयाच्या वॉशरूममध्ये पाशवी बलात्कार
बंगळुरू, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर तिच्या वर्गमित्राने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपी जीवन गौडा याने पीडितेला वॉशरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या 5 दिवसांनी पीडितेने पोल
प्रतिकात्मक लोगो


बंगळुरू, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर तिच्या वर्गमित्राने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपी जीवन गौडा याने पीडितेला वॉशरूममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या 5 दिवसांनी पीडितेने पोलिस तक्रार दाखल असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बंगळुरू येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी पिडीत विद्यार्थीनी आणि आरोपी

शिकतात. आरोपी आणि पिडीतेची पूर्वीपासूनच खोळख आहे. इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरला शिकणारा आरोपी जीवन गौडा याने 10 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या वॉशरूमध्ये पिडीतेवर अत्याचार केल्याची घटना घडली. पिडीता आणि आरोपी एकाच वर्गात होते. परंतु, पिडीता उत्तीर्ण होऊन सातव्या सत्रात गेली तर आरोपी सहाव्या सत्रात होता. घटनेच्या दिवशी आरोपीने बहाण्याने पिडीतेला कॉलेजच्या सहाव्या माळ्यावर बोलावले. तिला एकटीला पाहून त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या पिडीतेने तेथून पळ काढला. परंतु, आरोपी तिला बळजबरीने पुरुष शौचालयात घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेनंतर पिडीतेना आपल्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर 15 तारखेला स्थानिक हनुमंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पिडीतेच्या फिर्यादिवरून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कमल 64 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande