जळगाव, 17 ऑक्टोबर ,(हिं.स.) दिवाळी काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत असून याच दरम्यान, भुसावळ मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या जनरल बोगींच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुंबई लोकमान्य टिळक ते धनबाद विशेष रेल्वे सहा जनरल बोर्गीसह धावणार आहे.मुंबई ते धनबाद या धावणाऱ्या रेल्वेत सध्याच्या चार बोगींच्या जागी दोन अतिरिक्त कोच असतील. पुढील आठवड्यात २१ ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या रेल्वेत एका अतिरिक्त जनरल कोचसह धावण्याची शक्यता आहे.या मुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
दिवाळीमुळे गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जनरल बोगीत पाय ठेवण्यासाठी सुद्धा सध्या जागा उपलब्ध नाही. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रवाशांना सुटसुटीत प्रवास करता येईल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर