नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एआयसीसीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केलेल्या यादीत पहिल्या टप्प्यासाठी २४ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी २४ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने या ४८ उमेदवारांमध्ये पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश राम कुटुम्बा (अनुसूचित जाती) जागेवरून निवडणूक लढवतील. या यादीत १० अनुसूचित जाती आणि १ अनुसूचित जमातीची जागा आहे. काँग्रेस महागठबंधनसोबत युती करून निवडणूक लढवेल आणि लवकरच उर्वरित जागांची घोषणा करेल.
उमेदवारांची यादी: पहिला टप्पा (२४ उमेदवार) सोंबरसा (अनु.जा.): सरिता देवी; बेनीपुर: मिथिलेश कुमार चौधरी; सकरा (अनु.जा.): उमेश राम; मुजफ्फरपुर: बिजेंद्र चौधरी; गोपालगंज: ओम प्रकाश गर्ग; कुचायकोट: हरिनारायण कुशवाह; लालगंज: आदित्य कुमार राजा; वैशाली: संजीव सिंह; राजा पाकर (अनु.जा.): प्रतिमा कुमारी; रोसड़ा (अनु.जा.): ब्रज किशोर रवि; बछवाड़ा: शिव प्रकाश गरीब दास; बेगूसराय: अमिता भूषण; खगड़िया: चंदन यादव; बेलदौर: मिथिलेश कुमार निषा; दलखीसराय: अमरेश कुमार (अनिश); बारबीघा: तृसुलधारी सिंह; बिहार शरीफ: ओमैर खान; नालंदा: कौशलेन्द्र कुमार “छोटे मुखिया”; हरनौत: अरुण कुमार बिंद; कुम्हरार: इंद्रदीप चंद्रवंशी; पटना साहिब: शशांत शेखर; बिक्रम: अनिल कुमार सिंह; बक्सर: संजय कुमार तिवारी; राजपुर (अनु.जा.): विष्णुनाथ राम
दुसरा टप्पा (२४ उमेदवार) : बगहा: जयेश मंगल सिंह; नौतन: अमित गिरी; चनपटिया: अभिषेक रंजन; बेतिया: वासी अहमद; रक्सौल: श्याम बिहारी प्रसाद; गोविंदगंज: शशि भूषण राय (गप्पू राय); रीगा: अमित कुमार सिंह; टुन्नाबथनाहा (अनु.जा.): नवीन कुमार; बेनीपट्टी: नलिनी रंजन झा; फुलपरास: सुभोध मंडल; फोर्ब्सगंज: मनोज विश्वास; बहादुरगंज: मसवर आलम; कदवा: शकील अहमद खान; मनिहारी (अनु.जन.): मनोहर प्रसाद सिंह; कोरहा (अनु.जा.): पुनम पासवान; भागलपुर: अजीत कुमार शर्मा; सुल्तानगंज: ललन यादव; अमरपुर: जितेंद्र सिंह; चेनारी (अनु.जा.): मंगल राम; करगहर: संतोष मिश्रा; कुटुंबा (अनु.जा.): राजेश राम; औरंगाबाद: आनंद शंकर सिंह; वजीरगंज: अवधेश कुमार सिंह; हिसुआ: नीतू कुमारी
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule