जळगाव : चोरटय़ांनी मारला दागिन्यांवर डल्ला
जळगाव, 17 ऑक्टोबर (हिं.स.) बंद घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलुप कोयंडा तोडत चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटाचे आतील लॉकर तोडुन सोन्याचे दागिने तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर चोरुन नेला. वाघ नगर परिसरात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्या
जळगाव : चोरटय़ांनी मारला दागिन्यांवर डल्ला


जळगाव, 17 ऑक्टोबर (हिं.स.) बंद घराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलुप कोयंडा तोडत चोरट्यांनी घरात एन्ट्री केली. कपाटाचे आतील लॉकर तोडुन सोन्याचे दागिने तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर चोरुन नेला. वाघ नगर परिसरात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. पुरुषोत्तम भगवान पाटील (वय ४०, रा. प्लॉट ६३ वाघनगर दत्तमंदीरजवळ जळगाव) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. घराच्या लोखंडी दरवाजाला कुलुप लावुन ते कुटुंबासह गावी गेले होते. या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत दरवाजाचे कुलुप व कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. हॉल, बेडरुम व किचन रुममध्ये चोरट्यांनी मुद्देमालाचा शोध घेताना सामान अस्तव्यस्त केले. कपाटाचे मेन डोअर तोडुन कपाटातील सामान अस्तव्यस्त केला. आतील लॉकर तोडुन सोन्याचे दागिने तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर, राऊटर तसेच स्टॉपलायझर असा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले. २५ हजार रुपये किमतीची ९.५० ग्रॅम वजनाची मणी मंगळसुत्र असलेली सोन्याची पोत, ३० हजार किमतीची ११ ग्रॅम वजनाचे कानातील चार सोन्याचे जोड, पाच हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही डीव्हीआर, राऊटर व स्टॉपलायझर असा सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. पाटील कुटुंबिय दुपारी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. सपोनि अनंत अहिरे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande