राहुल गांधी यांनी फतेहपूरमध्ये घेतली हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबीयांची भेट
लखनऊ, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दलित युवक हरिओम वाल्मिकीच्या हत्येप्रकरणी आता एक नवा वळण आलेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी हरिओमच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी फतेहपूर येथे
राहुल गांधी यांनी फतेहपूरमध्ये घेतली हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबीयांची भेट


लखनऊ, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दलित युवक हरिओम वाल्मिकीच्या हत्येप्रकरणी आता एक नवा वळण आलेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी हरिओमच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी फतेहपूर येथे पोहोचले. मात्र त्याआधीच कुटुंबीयांनी एक व्हिडीओ जारी करून राहुल गांधींची भेट नाकारली होती. या कुटुंबीयांनी म्हटलं होतं की, त्यांना सरकारकडून मदत व नोकरी मिळालेली आहे आणि आता ते कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटू इच्छित नाहीत. तरीदेखील राहुल गांधी सुमारे अर्धा तास हरिओमच्या घरी थांबले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला.

भेटीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “हा गुन्हा एका कुटुंबाविरोधात नव्हे, तर संपूर्ण समाजाविरोधात झाला आहे. पण सरकार त्यांच्यावरच गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवत आहे. कुटुंबाला घरात नजरकैदेत ठेवलं जातंय, त्यांना धमकावलं जातंय.” राहुल गांधींनी हेही सांगितले की, “हरिओमची बहीण आजारी आहे, पण तिला उपचारासाठी बाहेरही जाऊ दिलं जात नाही.” तसंच त्यांनी प्रशासन आणि सरकारवर आरोप केला की, “कुटुंबावर दबाव टाकून व्हिडीओ जारी करायला लावला गेला, ज्यामध्ये असं दाखवलं गेलं की ते राहुल गांधींना भेटू इच्छित नाहीत.”

राहुल गांधी म्हणाले की, “देशभरात दलितांवर अत्याचार आणि हिंसा वाढत आहे. सरकारने त्यांच्या सन्मान आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी.” “मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून कुटुंबाला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी.”

“दोषींना वाचवण्याचा प्रयत्न न करता त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.”

राहुल गांधींना भेटण्याधी हरिओम वाल्मिकीच्या कुटुंबाने आधीच व्हिडीओ संदेशामधून स्पष्ट केले होते की, “आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्याशी भेटायचं नाही. सरकारने आमची मदत केली आहे, आर्थिक सहाय्य दिलं आहे आणि नोकरीही दिली आहे.” हरिओमचा लहान भाऊ शिवम वाल्मिकी म्हणाला, “मी सरकारच्या कारवाईवर समाधानी आहे. राहुल गांधी किंवा कोणताही पक्ष आमच्या घरी राजकारण करायला येऊ नये.”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी फतेहपूरमध्ये हरिओम वाल्मिकीची मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच सरकारने आर्थिक मदतीसह सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. पण राहुल गांधींच्या भेटीनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. एकीकडे कुटुंब सरकारच्या कारवाईवर समाधानी असल्याचं म्हणतंय, तर विपक्ष सरकारवर दबाव आणून कुटुंबाला न्यायापासून दूर ठेवल्याचा आरोप करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande