आसाम : लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान जखमी
गुवाहटी, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपथार भागात आज,शुक्रवारी सकाळी लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोध
संग्रहित


गुवाहटी, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील काकोपथार भागात आज,शुक्रवारी सकाळी लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्याने दिली.

या घटनेबाबत माहिती देताना लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री सुमारे 12.30 वाजेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी चालत्या वाहनातून काकोपथार कंपनीच्या तळावर गोळीबार केला. ड्युटीवर असलेल्या जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर देत कारवाई केली. मात्र, परिसरातील घरांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली.

लष्कराच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादरम्यान दहशतवाद्यांनी ऑटोमॅटिक शस्त्रांमधून जाणूनबुजून गोळीबार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला.या हल्ल्यात तीन जवानांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सद्यस्थितीत लष्कर आणि पोलिसांकडून एकत्रित शोधमोहीम राबवली जात आहे. हा परिसर आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या सीमेच्या जवळ आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande