मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले
सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.) मुंबईमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या अन् बार्शीचा रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. नागोबाचीवाडी (ता. बार्शी) येथील नातेवाइकाच्याच माध्यमातून एकाने आपण पोकलेन मशिनचा व्यवस
मुंबईच्या व्यापाऱ्याला बार्शीत १२ लाखांना गंडवले


सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)

मुंबईमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या अन् बार्शीचा रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याची १२ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. नागोबाचीवाडी (ता. बार्शी) येथील नातेवाइकाच्याच माध्यमातून एकाने आपण पोकलेन मशिनचा व्यवसाय भागीदारीमध्ये करू, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.अश्विनकुमार श्रीधर भिल्ल (रा. सुभाषनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. विठ्ठल दामोदर आहेर (रा. आझादनगर, एलबीएस मार्ग, साईबाबा मंदिर, घाटकोपर, वेस्ट मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना २०२० ते २०२३ दरम्यान घडली.नागोबाचीवाडी येथील साडूचा मुलगा आकाश बारंगुळे याने अश्विनकुमार भिल्ल याची ओळख जगदाळे मामा हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये करून दिली. पोकलेनची कामे कमिशनवर करून देतात, विश्वासू आहे, माझ्या विहिरीचे काम केले आहे, तुमची इच्छा असेल तर करा, असे आकाश बारंगुळेने सांगितले. त्यानंतर भिल्ल याचा संपर्क वाढला. भागीदारीत पोकलेन मशिन खरेदी करण्याचे व किमान रक्कम १२ लाख रुपये दोघांत देण्याचे ठरले. पण त्याच्याकडे काहीच पैसे नाहीत, असे भिल्लने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande