सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
दीड-दोन वर्षांपासून पोलिस ठाण्यांमध्ये पडून असलेला ९९८ किलो ५२६ ग्रॅम गांजा गुरुवारी (ता. १६) नष्ट करण्यात आला. महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत तो मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला.
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या १२ पोलिस ठाण्यांच्या कारवायांमध्ये तो अमली पदार्थांचा साठा जप्त झालेला होता. मोहोळ, कामती, सोलापूर तालुका, बार्शी शहर, करमाळा, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, मंगळवेढा, अकलूज, करकंब, वैराग या पोलिस ठाण्यांनी तो मुद्देमाल जप्त केला होता. खूप वर्षांपासून तो पोलिस ठाण्यांमध्येच पडून असल्याने अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यासाठी अमली पदार्थ नाश समिती नेमली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड