सोलापूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरिबी झोपडपट्टी क्रमांक एकमध्ये एकाची डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. यतिराज दयानंद शंके (वय ३६ रा. गरिबी झोपडपट्टी क्रमांक एक) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे या दोन जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरात खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. माहिती समजताच बघ्यांची व प परिसरातील नागरिक व नातेवाइकांची घटनास्थळी गर्दी झाली होती.
मृताची पत्नी प्रतीभा शंके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घराबाहेर भांडणे सुरू होती. पती यतिराज शंके यास दोन्ही आरोपी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. आरोपी आकाश यांनी त्याच्या राहत्या घरातील कुऱ्हाड आणून पतीच्या डोक्यात पाठीमागून वार केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड