नाशिकमध्ये शुर्पणखाच्या प्रतिमेचे दहन
नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। - शहरात पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन या संघटनेतर्फे आज शुर्पणखा दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात वाढत्या प्रमाणात खोट्या केसेस जसे की घरगुती हिंसाचार (DV Act), 498A, खोट्या पोटगी मागण्या आदींचा वापर करून निर्दोष
नाशिकमध्ये शुर्पणखाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.


नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

- शहरात पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन या संघटनेतर्फे आज शुर्पणखा दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात वाढत्या प्रमाणात खोट्या केसेस जसे की घरगुती हिंसाचार (DV Act), 498A, खोट्या पोटगी मागण्या आदींचा वापर करून निर्दोष पुरुष व त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जात आहे.

या चुकीच्या प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून पुरुषांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या नीच वृत्तीच्या महिलांचा म्हणजेच शुर्पणखा दहन करण्यात आले. ज्या प्रकारे रामायणकाळात शुर्पणखाने आपल्या स्वार्थासाठी खोटे आरोप व अन्यायकारी मागण्या केल्या होत्या, त्याच धर्तीवर आज काही स्त्रिया कायद्याचा दुरुपयोग करून पुरुषांविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये खोटे गुन्हे दाखल करून शारीरिक मानसिक आर्थिक हानी होईल नीच वृत्तीच्या महिला न्यायालयात खोटे खटले दाखल करून पुरुषांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. शुर्पणखाच्या प्रतिमेचे दहन करून नीच वृत्तीच्या मानसिकतेच्या महिलांच्या विचारांचे नाशिकमध्ये स्वाभिमानी पुरुष फाउंडेशनच्या वतीने नाशिकमध्ये दहन करण्यात आले.

या दहनातून खोटे खटले, खोटे आरोप व खोट्या पोटगी मागण्यांचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत दाभाडे यांनी सांगितले की , “कायदा हा स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी आहे, परंतु काही स्त्रिया त्याचा गैरवापर करून निर्दोष पुरुषांना व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक छळ करतात. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. शुर्पणखा दहन ही अन्यायाविरोधातील आमची लढाई आहे.”

कार्यक्रमात संघटनेचे उपाध्यक्ष तुषार भोसले, नाशिक तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रतीकात्मक आंदोलनातून पुरुषांनी एकत्र येऊन खोट्या केसेस विरोधात आवाज उठवावा आणि समाजात न्यायाची जाणीव निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande