रत्नागिरी, 2 ऑक्टोबर, (हिं. स.) : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत पाठविली आहे.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाख आणि सेवा भारती (पश्चिम महाराष्ट्र) या संस्थेला 21 लाखांची मदत चेकद्रारे पाठवण्यात आली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव गणपतीपुळे संस्थानच्या या सामाजिक निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी