विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा रूजविण्याचे `भोंसला` कडून काम - आयुक्त खत्री
भोसला कॅम्पसमध्ये जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्तांकडून शस्त्रपूजन नाशिक, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)। आजच्या युगात विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी भरकटत चाललेले दिसते. अशा काळात विद्यार्थ्यामध्ये शिस्तीबरोबरच देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा रूजविण्याचे धडे `भोसला` मधून दिले
विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा रूजविण्याचे `भोंसला` कडून काम आयुक्त  खत्री-


विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीबरोबरच देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा रूजविण्याचे `भोंसला` कडून काम आयुक्त  खत्री-


भोसला कॅम्पसमध्ये जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्तांकडून शस्त्रपूजन

नाशिक, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)। आजच्या युगात विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी भरकटत चाललेले दिसते. अशा काळात विद्यार्थ्यामध्ये शिस्तीबरोबरच देशभक्ती,राष्ट्रनिष्ठा रूजविण्याचे धडे `भोसला` मधून दिले जात आहे. आयुष्यांच्या वळणावर हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी व्यक्त केला.

भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये झालेल्या शस्त्र व अश्व पूजनासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा हे सपत्नीक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड.अविनाश भिडे,सरकार्यवाह हेमंत देशपांडे, कार्यवाह मिलिंद वैद्य,नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजि.संजय पगारे, डॉ.मनोहर शिंदे,आनंद देशपांडे,अँड.सुयोग शहा नरेंद्र वाणी,आसावरी धर्माधिकारी, सीएमए श्री.जोशी आदी उपस्थित होते. उभयतांचे हस्ते शस्त्र व अश्वांचे पूजन करण्यात आले. सौ.खत्री यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, उपप्राचार्य आरपी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.सौ.स्नेहा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले.

भोसला स्कूलमध्ये उत्साहात शस्त्रपूजन

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याहस्ते शस्त्रपूजन झाले. तत्पुर्वी त्यांनी संस्थापक धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्कूलच्या कॅम्पची पाहणी करत शिक्षण व स्वयंशिस्तीच्या धड्याची माहिती घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी श्री.शर्मा यांचे स्वागत केले.

भोसला गर्ल्स स्कूलमध्ये पोलिस आयुक्तांची उपस्थिती

भोसला गर्ल्स स्कूलच्या कार्यक्रमासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक प्रमुख पाहुणे होते, सुरवातीला विद्यार्थ्यांनी सलामी शास्त्राद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले .यावेळी आयुक्त जितेंद्र पाठक (अतिरिक्त संचालक ई.एस.डी.सी.नाशिक) श्री चेतन चंडोले ( वरिष्ठ तांत्रिक तज्ञ व संचालक धोरणात्मक तज्ञ), यांचेसह सौ. आसावरी धर्माधिकारी (अध्यक्ष्या विद्या प्रबोधिनी प्रशाला ), डॉ.विनिता देशपांडे , सौ. आदिती भिडे(शालेय विभाग समिती सदस्य) वसुधा कुलकर्णी अध्यक्षा भोंसला मिलिटरी स्कूल गर्ल्स आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अश्वपूजन व शस्त्र पूजन केले त्यानंतर शाळेच्या समादेशिका मेजर सपना शर्मा यांनी पाहुण्यांच्या कार्याची माहिती देत परिचय करून दिला. श्री. कर्णिक यांनी विद्यार्थांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. बा. शि. मुंजे यांनी ठेवलेल्या दूरदृष्टीविषयीचे व नारीशक्ती चे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande