मध्य रेल्वेकडून स्वच्छोत्सवाच्या कार्यक्रमासह महात्मा गांधी जयंती साजरी
मुंबई, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)। मध्य रेल्वेने २ ऑक्टोबर रोजी सध्या चालू असलेल्या ''स्पेशल कॅम्पेन ५.०( अंतर्गत स्वच्छता पखवाडा-२०२५ च्या उपक्रमांसह महात्मा गांधी जयंती साजरी केली. या स्मरणीय कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने उत्साह
Mumbai


मुंबई, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)।

मध्य रेल्वेने २ ऑक्टोबर रोजी सध्या चालू असलेल्या 'स्पेशल कॅम्पेन ५.०( अंतर्गत स्वच्छता पखवाडा-२०२५ च्या उपक्रमांसह महात्मा गांधी जयंती साजरी केली. या स्मरणीय कार्यक्रमांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि जनतेने उत्साहपूर्ण सहभाग घेतला, ज्यातून महात्मा गांधींच्या प्रचारित मूल्यांचे—स्वच्छता आणि सामाजिक स्नेहभावाचे दर्शन झाले.

श्री विजय कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती आणि सबर्बन कॉन्सकोर्सवर महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करून दिवसाचे कार्यक्रम सुरू केले. सबर्बन लॉबीमध्ये काढलेली रंगीबेरंगी रांगोळी महात्मा गांधींच्या महान व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या शिकवणीचे प्रतीक ठरली, जी सर्वांना आपल्या सभोवतालची स्वच्छता राखण्यास प्रेरित करणारी ठरली.

या प्रसंगी महाव्यवस्थापकांनी महात्मा गांधींच्या भित्तिचित्रे स्वच्छता संदेशांनी सजवलेल्या उपनगरी गाड्यांचे निरीक्षण केले. त्यांनी उपनगरी गाड्यांतील मोटरमनच्या केबिनचीही पाहणी केली.

महाव्यवस्थापकांनी त्यानंतर एका उपनगरी नवीनीकृत विशेष वरिष्ठ नागरिक कंपार्टमेंटचे निरीक्षण केले. मध्य रेल्वेच्या सानपाडा कार शेडने बॉम्बार्डियर उपनगरी गाड्यांमधील सामान डब्बा अशा विशेष सुविधेसाठी रूपांतरित केला आहे, यापूर्वी माटुंगा वर्कशॉपने सिमेन्स उपनगरी गाडीतील सामानाच्या डब्ब्याचे वरिष्ठ नागरिकांसाठी रूपांतर करून ही सुरूवात केली होती.

हा डब्बा आरामदायक आणि प्रवेशसहज आसन रचनेसह, उत्तम वातानुकूलन आणि दृश्यता देणाऱ्या स्टेनलेस स्टील ट्यूबुलर विभाजकांसह, तसेच डब्ब्याच्या आत व्हिनाइल कव्हरिंगसह सजवलेला आहे, ज्यामुळे वातावरण आणि दृश्य आकर्षण सुधारते. या सुधारणा वरिष्ठ नागरिकांसाठी अधिक आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी विचारपूर्वक राबवलेल्या रचना आहेत. वृद्धांसाठी ७ आसने, अँटीस्किड फ्लोरिंग आणि ग्रॅब हँडल्सची सोय केली आहे, ज्यामुळे सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो.

महाव्यवस्थापकांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह आणि “स्वच्छता ही सेवा” व “स्वच्छोत्सव” संदेशांनी सजवलेल्या इलेक्ट्रिक लोको आणि डिझेल लोकोचेही निरीक्षण केले.

परळ वर्कशॉपच्या सांस्कृतिक अकादमीतील कलाकारांनी “स्वच्छता ही सेवा” या थीमवर सादर केलेले प्रेरणादायी नुक्कड नाटक महाव्यवस्थापकांनी खूप कौतुकाने पाहिले. स्वच्छता आणि सामाजिक जागरूकता यावर आधारित “वेस्ट टू आर्ट” प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. विशेष डिझाइन केलेल्या गांधी भित्तिचित्र आणि सेल्फी पॉइंटवर भेट देणाऱ्या लोकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. प्रवाशांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि स्वच्छतेची सवय रूढ करण्यासाठी स्वच्छता शपथाच्या पॅंपलेट्सचे वितरण देखील करण्यात आले.

या प्रसंगी श्री प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक, प्रधान विभागप्रमुख आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तसेच श्री हिरेश मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग आणि मुंबई विभागातील शाखा अधिकारी उपस्थित होते.

स्पेशल कॅम्पेन ५.० (२ ऑक्टोबर–३१ ऑक्टोबर २०२५) अंतर्गत, मध्य रेल्वे स्वच्छता आणि ई-वेस्टच्या नियोजित विल्हेवाटीवर लक्ष केंद्रीत करून विविध उपक्रम राबवेल. या कॅम्पेनमध्ये संपूर्ण स्वच्छतेवर भर, जागेचे कार्यक्षम व्यवस्थापन, कार्यस्थळाची सौंदर्यपूर्वंक सुधारणा, पर्यावरणपूरक उपक्रम, हरित पद्धती आणि संपूर्ण नेटवर्कमध्ये डिजिटायझेशन यांनाही प्राधान्य दिले जाईल. स्थानकांवर नागरिकांचा अभिप्राय समाविष्ट करून थेट जनतेशी संवाद साधणे आणि अनावश्यक सामग्री व स्क्रॅप विक्रीतून महसूल वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल, ज्यामुळे रेल्वेमध्ये स्वच्छता आणि आधुनिक व्यवस्थापन मानकांचा संस्थात्मक समावेश सुनिश्चित होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande