पालघर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी श्री शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवे तर्फे रुपये दोन लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी माननीय इंदूराणी जाखड यांच्याकडे प्रदान करण्यात आला. राज्यातील तब्बल ६० लाख हेक्टर शेती क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी हा सदर देणगीमागचा प्रमुख हेतू असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. श्री शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवे हे दरवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस योगदान देत असून, आरोग्य व शिक्षण विषयक विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. नुकतेच गुणवंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच कॅन्सर सारख्या दुर्धर आजारासाठी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना देखील ट्रस्टतर्फे अनेक वर्षांपासून मदत केली जाते. या उपक्रमाचा लाभ आजपर्यंत अनेक रुग्णांना मिळाला आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL