धनंजय मुंडेंनी भगवान बाबांच्या समाधीचे घेतले दर्शन
बीड, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीआज विजयादशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भगवानगड येथे ऐश्वर्य संपन्न संतश्रेष्ठ श्री भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले . त्याचबरोबर गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेऊन
अ


बीड, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीआज विजयादशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भगवानगड येथे ऐश्वर्य संपन्न संतश्रेष्ठ श्री भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले . त्याचबरोबर गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली गडावर उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाचीही पाहणी केली.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की संत भगवानबाबा यांच्या दर्शनाने नवी ऊर्जा आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande