रत्नागिरी, 2 ऑक्टोबर, (हिं. स.) : विजयादशमीचे औचित्य साधून येथील घुडे वठारातील विलणकर वाडीतील श्रीएकमुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळातर्फे (प्रभाग क्रमांक १४) भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या हस्ते सौ. प्रेरणा पुरुषोत्तम विलणकर, सौ. अर्चना अशोक मयेकर, सौ. सत्यवती सत्यवान बोरकर, सौ. सुवर्णा सतीश शिरधनकर, सौ. स्मितल संतोष नागवेकर, सौ. प्रतिभा प्रकाश नाखरेकर, श्रीमती रेखा रवींद्र खातू, श्रीमती विजया विजय घुडे, श्रीमती मनीषा मनोहर नाचणकर, श्रीमती संगीता भास्कर मयेकर यांचा सत्कार करण्यात आला.या सर्व महिलांनी समाजात अध्यात्म, संस्कार आणि सांस्कृतिक जपणुकीचे कार्य सातत्याने केले असून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी