आदिवासी युवकांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास, शबरी महामंडळाचा गोदरेज व एएसडीसीसोबत करार
नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। आदिवासी युवकांना उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या वाढीव संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्
आदिवासी युवकांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास, शबरी महामंडळाचा गोदरेज व एएसडीसीसोबत सामंजस्य करार


नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

आदिवासी युवकांना उद्योगक्षेत्रात रोजगाराच्या वाढीव संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या एकलव्य कुशल कौशल्य विकास योजनेअंतर्गत गोदरेज एंटरप्राईजेस आणि ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) यांच्यासोबत 'सीएसआर'अंतर्गत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातुन राज्यातील २१० बेरोजगार आदिवासी युवकांना फोर्कलिफ्ट ऑपरेटर व मोटर ड्रायव्हिंग कोर्सचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

मंत्रालयात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त तथा शबरी आदिवासी विकास व वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ गोदरेज एंटरप्राईजेसच्या अश्विनी देवदेशमुख, प्रफुल मोरे, एएसडीसीचे आनंद खाडे, प्रसाद राठोड यांच्यासह यूएनडीपी व शबरी महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सामंजस्य करारामुळे आदिवासी युवकांना कौशल्यविकासाची संधी उपलब्ध होणार आहे. फोर्कलिफ्ट ऑपरेटर व मोटर ड्रायव्हिंग कोर्सच्या मोफत प्रशिक्षणाद्वारे युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्ये, शासकीय मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे व वाहन चालविण्याचे परवाने मिळतील. यामुळे युवकांसाठी थेट रोजगाराच्या नवीन वाटा खुल्या होऊन त्यांचा आत्मनिर्भरतेकडे प्रवास अधिक वेगाने होणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या युवक-युवतींना गोदरेज एंटरप्राईजेस आणि ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) यांचेमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दरम्यान, या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी यूएनडीपी आणि शबरी महामंडळ यांच्यावर असणार आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अधिक व्यापक व प्रभावी होणार आहे.

राज्यातील आदिवासी युवकांमध्ये प्रचंड क्षमता आणि जिद्द आहे, परंतु त्यांना योग्य कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगजगताशी संपर्काची गरज आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून आम्ही केवळ २१० युवकांनाच नव्हे, तर भविष्यात हजारो युवकांना रोजगारक्षम बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इच्छुक आदिवासी युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘एकलव्य कौशल्य योजना’ पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी.

-विजय वाघमारे, सचिवआदिवासी विकास विभाग

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande