नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
- शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री उशीरा पर्यंत गुन्हेगारी विरोधात धडाकेबाज कारवाई राबवण्यात आली.संपूर्ण शहरभर पोलिस निरीक्षक आणि एसीपी डीसीपी हे सर्व अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले होते.अनेक ठिकाणी गुन्हेगारांची धींड काढण्यात आली,तर ड्रग माफियांच्या अड्ड्यांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात साठा उद्ध्वस्त करण्यात आला.
आगामी निवडणुका आणि कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.कारवाईदरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वतःबारकाईने लक्ष ठेवत होते. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या धाडसी मोहिमेचे नाशिककरांनी स्वागत केले असून,छावा क्रांतिवीर सेनेचे करण गायकर आणि स्वराज्य संघटनेचे जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे यांनी आयुक्त संदीप कर्णिक यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानले.पोलिस दल सज्ज असून,नागरिकांनी देखील शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
जे गुन्हेगार समाजात दहशत निर्माण करत होते,त्यांच्यावर पोलिसांनी जे कठोर पाउल उचललंय,त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचं एकही बीज उरू देऊ नका! कायदा हातात घेतल्यावर काय परिणाम होतो,हे आता समजलं पाहिजे त्यांना.पोलिसांचं हे धाडसी पाऊल म्हणजे समाजासाठी दिलासा आणि गुन्हेगारांसाठी इशारा आहे.छावा पाठीशी आहे पोलिसांच्या – जोपर्यंत शेवटचा गुन्हेगार आडवा पडत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरू राहणार!- करण गायकर,संस्थापक अध्यक्ष,छावा क्रांतिवीर सेना
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV