शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात मविप्रचा डंका
नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या टप्पा २ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील तब्बल ७ शाळांनी यश मिळवत विविध गटांम
शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात मविप्रचा डंका


नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

: महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या टप्पा २ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक या संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील तब्बल ७ शाळांनी यश मिळवत विविध गटांमध्ये पारितोषिके प्राप्त केली आहेत.

मविप्रचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, कार्यकारी संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांनी हे सुयश मिळवले आहे.

या स्पर्धेत मोहाडी येथील केआरटी हायस्कूलने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला, तर तालुका स्तरावर –लोखंडेवाडी येथील जनता विद्यालयाने प्रथम, खेडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाने द्वितीय, आणि उमराळे बु. येथील जनता विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, बिट स्तरावर जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, करंजवण, जनता विद्यालय, कोराटे, जनता विद्यालय, हनुमंतपाडा या शाळांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

या सर्व शाळांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मविप्र संचालक प्रवीण जाधव, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शाळांच्या शाखाप्रमुख, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी कामगिरीबद्दल मविप्र सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी, कार्यकारी संचालक प्रवीण जाधव,सर्व विभागांचे शिक्षणाधिकारी, सर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व सभासद,सेवक यांनी सर्व शाळांचे अभिनंदन केले. या योजनेचे बक्षीस मिळविण्यासाठी शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande