जळगाव - महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली
जळगाव, 2 ऑक्टोबर, (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या “भजन प्रभात” या कार्यक्रमात सादर झालेल्या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात भारताचे मा
जळगाव - महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली


जळगाव, 2 ऑक्टोबर, (हिं.स.) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंती निमित्त गांधी टेकडीवर झालेल्या “भजन प्रभात” या कार्यक्रमात सादर झालेल्या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना देखील वंदन करण्यात आले. विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्यावतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वैष्णव जन तो तेने कहीये, राष्ट्र वंदना, कबीरा कहे ये जग अंधा, हमको मन की शक्ती , आनंद या जीवनाचा, समय बडा बलवान, मत कर माया का अहंकार, सुहागन तीरथ करने चली, या जन्मावर या जगण्यावर, गुजरा न करो गरीबीमे, हीच अमुची प्रार्थना, जे का रंजले गांजले या भजनांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला .

तेथे कुलगुरुं समवेत विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतल्या. या कार्यक्रमास कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ अतुल बारेकर, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, रासेयो संचालक डॉ. रोकडे, प्रा. के.पी. दांडगे, प्रा.मनसरे, प्रा. राम भावसार, प्रा. मनोज इंगोले, आदी उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande