लासलगाव येथे संघाचे सघोष पथसंचलन
लासलगाव, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। विजयादशमी निमित्त लासलगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सघोष पथसंचलन करण्यात आले.संघ स्थापनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने यावर्षीचे संचलन व कार्यक्रमांना विशेष महत्व आहे.अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संच
लासलगाव येथे रा.स्व संघाचे सघोष पथसंचलन


लासलगाव, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

विजयादशमी निमित्त लासलगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सघोष पथसंचलन करण्यात आले.संघ स्थापनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने यावर्षीचे संचलन व कार्यक्रमांना विशेष महत्व आहे.अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संचलन लासलगावकरांना अनुभवायला मिळाले.या वेळी शहरात संचलन मार्गावर नागरिकांनी रांगोळी काढून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले

सकाळी नऊ वाजता सरस्वती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वयंसेवकांचे एकत्रीकरण केल्यानंतर ध्वजाला वंदन करून या संचलनाला प्रारंभ करण्यात आला.संचलनात सह घोष (बँड) पथक,ध्वज,दंडासह संघाच्या गणवेशातील जवळपास तीनशे स्वयंसेवक तसेच लासलगाव व परिसरातील संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.सदर पथसंचलन शहरातील विविध भागातून मार्गस्थ झाल्यानंतर या संचलनाची सांगता लासलगाव ग्रामपंचायत च्या प्रांगणात करण्यात आली

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प.महाराष्ट्र प्रांत बौद्धिक प्रमुख सुनील कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्या प्रसारक मंडळ लासलगाव चे सरचिटणीस गोविंदराव होळकर उपस्थित होते.

या वेळी प्रमुख वक्ते सुनील कुलकर्णी यांनी कुटूंब प्रबोधन,पर्यावरण,सामाजिक समरसता,नागरी शिष्टाचार स्व बोध या पाच मुद्द्यावर मार्गदर्शन करताना सांगितले की लहान मुलांवरती संस्कार होणे आवश्यक असून यासाठी कुटुंब प्रबोधन एक महत्त्वाचा विषय आहे तसेच सर्वांनी पर्यावरण रक्षण करून सेंद्रिय शेतीचा वापर करावा जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल.समाजात समरसता निर्माण होणे काळाची गरज असून कुठलाही दुजाभाव नसावा.आपण सगळे हिंदू म्हणून एकाच मातेचे पुत्र आहोत अशी भावना सगळ्यांच्या मनात असावी.देशासाठी आपला काहीतरी वेळ आणि सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने आगामी होणार्‍या सर्व कार्यक्रमांमध्ये संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रमुख पाहुणे गोविंदराव होळकर यांनीही संघाच्या शताब्दी निमित्त आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.या वेळी स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिक सादर केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लासलगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande