साेलापूरातील नुकसानग्रस्तांच्या बँकेत जमा होऊ लागले पैसे
सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्यांना शासनाच्यावतीने प्रतिकुटुंब १० हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यास सुरुवात झाली आहे. बाधितांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाऊ लागली आहे. उत्तर सोलापूर, दक्
साेलापूरातील नुकसानग्रस्तांच्या बँकेत जमा होऊ लागले पैसे


सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

अतिवृष्टी आणि महापुराचे पाणी घरात शिरल्याने नुकसान झालेल्यांना शासनाच्यावतीने प्रतिकुटुंब १० हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यास सुरुवात झाली आहे. बाधितांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाऊ लागली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट आणि करमाळा तालुक्यातील बाधितांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. माढा आणि मंद्रूप अपर तहसीलच्या कार्यक्षेत्रातील बाधितांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठाला महापुराचा मोठा फटका बसला आहे. महापुरात आणि अतिवृष्टीत बाधित झालेल्यांचा पंचनामा जिल्हा प्रशासनाने पूर्ण केला आहे. प्रतिकुटुंब दहा हजार या प्रमाणे ९ हजार ८७७ जणांना ९ कोटी ९१ लाख ६० हजार रुपयांची मदत जमा केली जात आहे. माढ्यातील ३७४४, मंद्रूप अपर तहसीलमधील २६०७, उत्तर सोलापूर तालुक्यातील ११२२, बार्शीतील २८१, दक्षिण सोलापूरमधील ३०८, अक्कलकोटमधील ४७५, पंढरपुरातील ७६, मोहोळमधील ७९४, करमाळ्यातील ४७० जणांना ही मदत मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande