दसर्‍यानिमित्त काळारामाची निघाली पालखी
नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। - देशातील प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरामध्ये दसरा सणा निमित्ताने श्री रामाची पालखी काढण्यात आली. यावेळी हजारो भक्त उपस्थित होते. जगप्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरात परंपरेनुसार दसरा सण मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वाता
श्री काळारामाची सायंकाळी निघाली पालखी


नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

- देशातील प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरामध्ये दसरा सणा निमित्ताने श्री रामाची पालखी काढण्यात आली. यावेळी हजारो भक्त उपस्थित होते.

जगप्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरात परंपरेनुसार दसरा सण मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो पारंपरिक धार्मिक विधी यावेळी करण्यात येतात दसऱ्यानिमित्ताने काकडा आरती नरेंद्र पुजारी , पंचामृत महापूजा नवीन वस्त्र दागिने व अलंकार सजावट धनंजय पुजारी, दीपक कुलकर्णी , वाघमारे , शस्त्र पूजन व पालखीचे ह्या वर्षाचे मानकरी हेमंत बुवा पुजारी व शेजारती वैभव पुजारी हे होते.

परंपरेनुसार दसरा सणाच्या वेळी सायंकाळी प्रसिद्ध असलेल्या काळाराम मंदिरातील रामाची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. त्यांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्रीरामाची प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी हजारो भक्तगण रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande