साेलापूर जिल्ह्यातील ८३७ गावांना अतिवृष्टीचा फटका
सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील लहान मोठ्या अनेक लाखो तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६० टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८
साेलापूर जिल्ह्यातील ८३७ गावांना अतिवृष्टीचा फटका


सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील लहान मोठ्या अनेक लाखो तब्बल चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६० टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले असून कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ८३७ गावांमधील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. बाधितांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ५१ हजार २५६ हेक्टरवरील जिरायती क्षेत्राचे तर एक लाख आठ हजार ८८ हेक्टर बागायती आणि ३८ हजार ८९० हेक्टरवरील फळपिकांचेही नुकसान झाले आहे. त्यात तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, मका, ऊस, भाजीपाला, कांदा, पेरू, केळी, झेंडू, बाजरी, कडवळ, टोमॅटो, काकडी, शेवंती, मोगरा, डाळिंब, द्राक्ष, भुईमूग, शेवगा सूर्यफूल अशा पिकांचा समावेश आहे. अप्पर मंद्रूप, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, सांगोला या तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात नमूद आहे. दरम्यान, नुकसान झालेले क्षेत्र वाढू शकते, असेही कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande