नाशिक, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
नाशिक शहरातील वाढत चाललेली गुन्हेगारी आणि व्यसनात गुरफटलेली तरुणाई या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीसाठी शहर भाजपतर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अॅड. राहुल ढिकले आणि भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार आदि उपस्थित होते.
नाशिक शहर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक केंद्र असून येथे शांततेची परंपरा कायम ठेवणे, ही काळाची गरज आहे. तसेच, अलीकडच्या काळात शहरात चोरी, दरोडे, लूटमार, सोनसाखळी चोरणे, एमडी ड्रग्स, अवैध धंदे आणि टोळीयुद्धाचे प्रकार लक्षणीय वाढले आहेत. विशेषतः तरुणाईमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मादक पदार्थांचे सेवन व विक्रीमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे ओढली जात आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून नाशिकच्या भविष्यासाठी चिंताजनक व धोकादायक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या
संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवावी २४ तास गस्ती पथकांची नेमणूक करा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून नियमित देखभाल करा बसविलेले सीसीटीव्ही २४ तास कार्यरत करा मादक पदार्थाच सेवन, या विक्री व त्यामागील रॅकेटवर कठोर कारवाई करा व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणाईला बाहेर दु काढण्यासाठी विशेष मोहीम व जनजागृती उपक्रम राबवा टोळीयुद्ध व गटबाजीवर नियंत्रणासाठी विशेष कार्यबल स्थापन करा नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोहल्ला सुरक्षा समित्या सक्रिय करा नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवर ठोस कार्यवाही करा.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV