रायगड, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने धामोते गाव हद्दीत नव्या कार्यालयाचे लोकार्पण रायगड जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना घारे म्हणाले, “मतदार संघातील रावणाचा वध करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. आगामी स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून आपण एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.”
नरेश जोशी व माधवी जोशी यांच्या पुढाकारातून उभारलेले हे कार्यालय नेरळ व परिसरातील नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत भगत, आशोक भोपतराव, एकनाथ धुळे, दिपक श्रीखंडे, नरेश व माधवी जोशी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चिंचवली येथील भरत भगत व धीरजकुमार रॉय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके