मनमाड, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।मनमाड येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर मोकाट कुत्र्याने हल्ला केला.या हल्ल्यात या महिलेला अनेक ठिकाणी चावा घेतला यामध्ये महिलेचा एक बोट अक्षरशः तुटून गेला आहे.महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. आरोग्य मित्र महेंद्र गरुड यांनी तात्काळ या महिलेला 108 रुग्णवाहिका बोलावून नाशिक येथे उपचारासाठी पाठवले आहे. महिलेची प्रकृती गंभीर असुन पुढील उपचार सुरू आहेत.
मनमाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी अक्षरशः अनेकांना चावा घेतला आहे .मनमाड शहरातील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या पुष्पा आहिरे यांच्यावर मोकाट कुत्र्यानी हल्ला केला. या कुत्र्याने महिलेला अनेक ठिकाणी चावा घेतला यामध्ये महिलेचा एक बोट देखील अर्धा तुटला. महिलेला तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेवर प्राथमिक उपचार करून तत्काळ नाशिक ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथून महिलेला मेडिकल कॉलेज मध्ये नेऊन उपचार करण्यात येत आहे. महिलेची परिस्थिती गंभीर असुन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV