सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर
सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका बसला. १६ दिवसांपासून सीनाकाठचे ग्रामस्थ महापुराच्या संकटाशी संघर्ष करत आहेत. आता महापूर ओसरला आहे, महापुराचे पाणी ओसरले आहे. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी
सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर


सोलापूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।

माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका बसला. १६ दिवसांपासून सीनाकाठचे ग्रामस्थ महापुराच्या संकटाशी संघर्ष करत आहेत. आता महापूर ओसरला आहे, महापुराचे पाणी ओसरले आहे. मात्र पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी ओसरलेले नाही. पूरग्रस्तांसमोर आता अनेक समस्या, अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. संसाराचा गाडा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ निवाराकेंद्रातून आणि पै-पाहुण्यांच्या गावावरून आपल्या मूळ गावी परतत आहेत.

मागील १६ दिवसांपासूनचा महापुराच्या पाण्याशी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा समस्या अडचणी आरोग्य यांच्याशी असलेला संघर्ष आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. ग्रामस्थ निवारा केंद्रातून आणि पै-पाहुण्यांच्या गावावरून घरात परतत आहेत. दसऱ्याच्या सणासाठी घरातील चिखल आणि राडारोडा, स्वच्छ करत आहेत. शेतकऱ्याला मात्र चिखलामुळे स्वतःच्या शेताच्या बांधावर जाता येत नाही. कदाचित आता शेतकऱ्याला स्वतःचे बांध ओळखणेही कठीण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande