इस्लामाबाद, 20 ऑक्टोबर (हिं.स.)पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सोमवारपासून सुरुवात झाली. पाकिस्तानने या सामन्यासाठी ३8 वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज आसिफ आफ्रिदीचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. या सामन्यात आसिफ कसोटी पदार्पण करत आहे. स्पॉट फिक्सिंगमुळे सहा महिन्यांची बंदी घालण्यात आलेल्या आफ्रिदीने अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पाकिस्तानने अबरार अहमदऐवजी त्याला पसंती दिली आहे. तो पाकिस्तानच्या नियमित फिरकी गोलंदाजांसह, डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अली आणि ऑफ स्पिनर साजिद खान यांच्यासोबत फिरकीची धुरा सांभाळणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल आफ्रिदीवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने परतण्याची परवानगी देण्यापूर्वी त्याच्यावर सहा महिने बंदी घालण्यात आली होती. पण बोर्डाने त्याच्यावरील बंदी शिथिल करण्याचे कोणतेही कारण दिले नाही. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी ९४ धावांनी जिंकली होती.
पाकिस्तानकडून पदार्पण करणारा आसिफ आफ्रिदी ३८ वर्षांचा आहे. त्याचा जन्म २५ डिसेंबर १९८६ रोजी पेशावर येथे झाला. तो दोन महिन्यांत ३९ वर्षांचा होणार आहे. त्याने जानेवारी २००९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आजपर्यंत आफ्रिदीने ५७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६० लिस्ट ए सामने आणि ८५ टी-२० सामने देखील खेळले आहेत. तो तळाच्या फळीत फलंदाजी करूनही योगदान देऊ शकतो. आफ्रिदीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही शतक झळकावले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे