दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय
वेलिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. क्राइस्टचर्चमध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४ बाद २३६ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ १८ षटकांत १७१ धाव
आदिल राशिद


वेलिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. क्राइस्टचर्चमध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४ बाद २३६ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ १८ षटकांत १७१ धावांतच गारद झाला.

इंग्लंडकडून फिल सॉल्टने ५६ चेंडूत ८५ धावा केल्या, तर कर्णधार हॅरी ब्रूकने ३५ चेंडूत ७८ धावा केल्या. लेग-स्पिनर आदिल रशीदने ३२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. मालिकेतील तिसरा टी-२० सामना २३ ऑक्टोबर रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाणार आहे. पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्या षटकात यष्टिरक्षक जोस बटलर 4 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत जेकब बेथेलने फिल सॉल्टसह संघाला ५० धावांच्या पुढे नेले. बेथेलने १२ चेंडूत २४ धावा केल्या.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, कर्णधार हॅरी ब्रूक आणि फिल सॉल्ट यांनी संघाला २०० धावांच्या जवळ नेले. ब्रूक ३५ चेंडूत ७८ धावा काढून बाद झाला. त्याने ६ चौकार आणि ५ षटकार मारले. त्यानंतर लगेचच सॉल्ट ५६ चेंडूत ८५ धावा करत बाद झाला. त्याने ११ चौकार आणि १ षटकार मारला.

शेवटी, सॅम करनने ३ चेंडूत ८ धावा आणि टॉम बँटनने १२ चेंडूत २९ धावा करून संघाला २३६ धावांपर्यंत पोहोचवले. न्यूझीलंडकडून काइल जेमीसनने २ विकेट्स घेतल्या. तर जेकब डफी आणि मायकेल ब्रेसवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

२३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली, त्यांनी फक्त १८ धावांत २ विकेट्स गमावल्या. टिम रॉबिन्सन ७ धावांवर आणि रचिन रवींद्र ८ धावांवर बाद झाले. टिम सेफर्टने मार्क चॅपमनसह संघाला १०० धावांच्या जवळ आणले. चॅपमन २८ धावांवर आणि सेफर्ट ३९ धावांवर बाद झाले.

डॅरिल मिशेल ९ धावांवर आणि मायकेल ब्रेसवेल फक्त २ धावांवर बाद झाले. संघाने १०४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या. त्यानंतर जेम्स नीशमने १७ धावांवर आणि कर्णधार मिशेल सँटनरने ३६ धावांवर बाद होऊन संघाला १५० धावांच्या पुढे नेले. शेवटी, जेकब डफी १ धावांवर आणि मॅट हेन्री ८ धावांवर बाद झाला. आणि संघ १७१ धावांवर ऑल आऊट झाला.

इंग्लंडकडून लेग-स्पिनर आदिल रशीदने ३२ धावांवर ४ विकेट्स घेतल्या. लियाम डॉसनने ३८ धावांवर २ विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्स आणि ल्यूक वूडनेही प्रत्येकी दोन फंलदाजांना बाद करण्यात यश आलं घेतले. हॅरी ब्रूकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande